“धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेचा’ लाभ घ्यावा”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११;(गडचिरोली): “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २५ जुलै पर्यंत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण संस्थेत तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यास क्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” अंतर्गत शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. तसेच सदर योजनेच्या सुधारीत शासन निर्णय दि.21 जुन 2024 (इतर मागास व बहुजन कल्याण विभाग) अन्वये विद्यार्थी व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तालुकास्तर व जिल्हास्तरीय महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी धनगर समाजातील असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परिक्षेमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली भटक्या जमाती क प्रवर्गाचा जतीचा दाखला/ भटक्या जमाती क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अनाथ प्रवर्गातुन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
या योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थ्यास शासनाने वेळोवेळी निर्धारीत केल्याप्रमाणे आरक्षण असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50 टक्के इतकी राहील. दिव्यांग प्रवर्गातुन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदर योजने अंतर्गत महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारीत करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली या कार्यालयात अर्जाची प्रत व क्युआर स्कॅनर उपलब्ध आहे,