December 23, 2024

“दोन जहाल महिला नक्षलींचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११:(गडचिरोली): सुमारे १६ लाख रुपयांचे ईनाम असलेल्या दोन जहाल नक्षली महिलांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई(३६) आणि अखिला संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती(३४)अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावे आहेत.

प्रमिला सुखराम बोगा उर्फ मंजुबाई ही धानोरा तालुक्यातील बोगाटोला येथील रहिवासी आहे. २००५ मध्ये ती टिपागड दलमची सदस्य झाली. २०११ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. पुढे २०१४ पर्यंत वैरागड दलम आणि त्यानंतर केकेडी दलममध्ये काम केले. २०१५ मध्येू कंपनी क्रमांक ४ मध्ये तिची बदली झाली. पुढे २०१८ मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून बढती मिळाल्यानंतर २०२१ पर्यंत ती तेथे कार्यरत होती. २०२२ मध्ये दंडकारण्य सप्लाय टीममध्ये बदली होऊन आजतागायत ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २०, जाळपोळीचे २ आणि अन्य १८ असे एकूण ४० गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

अखिला पुडो ही धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील रहिवासी आहे. २०१० मध्ये ती टिपागड दलममध्ये सहभागी झाली. २०१४ मध्ये ती प्लाटून क्रमांक १५ आणि त्यानंतर कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य झाली. २०१५ मध्ये ती दंडकारण्य सप्लाय टीमची सदस्य झाली. २०१८ पासून ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य झाली आणि आजतागायत कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे २, खुनाचे ४ आणि अन्य १ असे एकूण ७ गुन्हे दाखल असून, राज्य शासनाने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

२०२२ पासून आतापर्यंत २१ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करुन स्वाभिमानाचे जीवन जगावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!