“संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११;(गडचिरोली): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी चर्मकार समाजातील चांभार, ढोर, मोची, व होलार या चार जातीतील वय 18 ते 50 वर्षे असलेल्या व 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादेतील लोकांना स्वयंरोजगारासाठी सन 2024-25 या चालू वर्षात बँकेमार्फत 50 टक्के अनुदान योजना, 50 हजार रुपये पर्यत बीज भीज भांडवल योजना, 50 हजार, 001 ते 5 लाख पर्यत त्याचप्रमाणे महामंडळ पुरस्कृत महिला अधिकारीता योजना 5 लाख रुपये, मुदती कर्ज योजना, 2 लाख ते 5 लाख रुपये पर्यंत, लघुऋण योजना 1.40 (एक लाख चाळीस हजार रुपये) पर्यत, महिला समृद्धी योजना 1.40 हजार रुपये व शैक्षणिक योजना (देशात शिक्षणासाठी 10 लाख रुपये व परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपये) या योजनाचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून या योजनांमध्ये 10 हजार रुपये अनुदान हे आता 50 हजार पर्यंत योजनानिहाय देण्यात येत आहे.
या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी चर्मकार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची व होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत मूळ कागदपत्रांसह स्वत: अर्जदाराने उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ किंवा मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. गडचिरोली राजेंद्र टी. जिभकाटे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.च्या पाठीमागे, एल.आय.सी. रोड, गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.