“तीन दिवसांपासून वीज खंडित ; जारावंडी परिसरातील ५० गावे अंधारात”

गडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १२ (एटापल्ली): तालुक्यातील जारावंडी परिसरातील ५० गावांचा वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे ही गावे अंधारात सापडली आहेत. पावसाळ्यामुळे डासांची पैदास वाढली असताना वीज नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जारावंडी परिसरातील लाईन पेंढरी येथील उपकेंद्राशी जोडली आहे. पेंढरीतील लाईन गडचिरोलीवरून जोडली आहे. गडचिरोली ते पेंढरीचे अंतर
जवळपास ७० किमी आहे. ज्या भागातून वीज पुरवठा करण्यात आला आहे. तो संपूर्ण परिसर जंगलाने व्यापला आहे. तीन दिवसांपासून वीज खंडित झाला असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाईन कामे ठप्प पडली आहेत. मोबाइल डिस्चार्ज झाले आहेत. प्यायला पाणी मिळत नसल्याने विहीर व कालव्यातून पाणी आणावे लागत आहे. वीज नसल्याने शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प झाले आहे