December 23, 2024

“आझाद समाज पार्टीची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी घोषित; जिल्हाध्यक्षपदी राज बन्सोड”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क; जुलै १४, (गडचिरोली): नुकताच झालेल्या लोकसभेत बहुजन आंदोलनातील सर्व नेते आणि पक्षांची पीछेहाट पाहता देशभरात बहुजन आंदोलनाचे नेतृत्व लयास जातानाचे चित्र उभे राहताना, अशा परिस्थिती मध्ये जनतेच्या न्याय हक्काच्या आंदोलनातून पुढे आलेला तरुण नेता भिम आर्मी चीफ व आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण स्वतंत्रपणे खासदार म्हणून निवडून आल्याने देशभरात एक आशा निर्माण झाली व बहुजन चळवळीला गती प्राप्त होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गडचिरोलीमध्ये प्रदेशाद्यक्ष आनंद लोंढे, प्रदेश प्रभारी अविनाश शांती आणि प्रदेश प्रवक्ते ॲड. सुमित साबळे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला व कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री जराते उपस्थित होत्या.

पक्षाच्या जिल्हाप्रभारी पदी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्षपदी राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोद मडावी यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा महासचिवपदी पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा प्रवक्तेपदी प्रितेश अंबादे, जिल्हा सचिवपदी प्रकाश बन्सोड, कुरखेडा तालुकाध्यक्षपदी सावन चिकराम, धानोरा तालुकाध्यक्षपदी प्रशांत पेदापल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्षपदी नागसेन खोब्रागडे तसेच महिला कार्यकारिणी मध्ये जिल्हाध्यक्षपदी तारका जांभुळकर, जिल्हा सचिवपदी शोभा खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्षपदी सविता बांबोळे, शहराध्यक्षपदी प्रतिमा करमे, वडसा तालुकाध्यक्षपदी सपना मोटघरे इत्यादी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून लवकरच पक्ष विस्तार होणार आहे.

आगामी निवडणुकीत देशभरात आझाद समाज पक्ष निवडणुकीत ताकदीने उतरणार असून महाराष्ट्रात किमान 10 सभा भाई चंद्रशेखर आझाद यांच्या होणार आहेत. त्यापैकी गडचिरोली मध्ये एक सभा होणार आहे.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून विकासाच्या दृष्टीने कायम वंचित राहिलेला तर आहेच. परंतु येथील आदिवासी संस्कृती व न्याय हक्कावर गदा आणण्याचे काम आजवर होत राहिले आहे. त्याचेच परिणाम म्हणजे इथे पेसा कायद्याची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झाली नाही, सुरजागड सारख्या खाणी जिल्ह्यात आणून आदिवासीच्या जल-जंगल-जमीन हिसकावून घेऊन आदिवासी जिवन उध्वस्त करणे, ज्या ठिकाणी अद्याप शिक्षण पोहचला नाही अशा ठिकाणच्या हजारो सरकारी शाळा बंद करणे, अतिशय दुर्गम भागात आदिवासी आश्रम शाळा व सरकारी दवाखान्यात जिकरीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजंदारीचे मजुरासारखे वागविणे, जिल्ह्यात कोणत्याही भरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य न देणे ह्या सर्व अन्यायकारक बाबी असून शिक्षण, आरोग्य व रोजगार यासोबत आदिवासीचे अधिकाराचे हनन या मूलभूत मुद्यांना घेऊन आझाद समाज पार्टी जिल्ह्यात पुढील निवडणुकामध्ये उतरणार आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी केले.

दलित, आदिवासी व मुस्लिमांसह ओबीसी मधील वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर नव्हे तर संसदेत खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रभारी अविनाश शांती यांनी केले.

संचालन प्रितेश अंबादे तर आभार प्रतीक डांगे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पवन माटे, पुरुषोत्तम बांबोळे, सचिन गेडाम, प्रणय दरडे, प्रेम धनविजय, जितेंद्र बांबोळे, घनश्याम खोब्रागडे, सोनाशी लभाने, तामस शेडमाके, सतीश दुर्गमवार, आशिष गेडाम, शुभम पाटील, अमोल मोटघरे, सुनिल बांबोळे, मधुकर लोणारे, सुरेश बारसागडे, जयश्री बांबोळे, नेहा रामटेके आदींनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!