मंत्री धर्मरावबाबा आत्राम शनिवारपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर अहेरी, एटापल्लीत कामांचा घेणार आढावा
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १६; (गडचिरोली ) : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवडाभरापासून जिल्ह्यात दाखल झाले आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचे राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन झाले. मंगळवारी पूर्ण दिवस त्यांचा अहेरीत राखीव राहणार आहे.
बुधवारी दुपारी 12 वाजता वडलापेठ येथे सुरजागड इस्पात कंपनीच्या लोहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता प्राणहिता हेलिपॅडला पोहोचतील. तेथून अहेरीत येतील. गुरूवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता अहेरी तहसील कार्यालयात विकास कामांची आढावा बैठक घेतील. शुक्रवार दि.19 रोजी सकाळी 11.30 वाजता एटापल्ली तहसील कार्यालयात विकास कामांची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता एटापल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहतील. शनिवार, दि.20 रोजी सकाळी 9 वाजता अहेरीवरून नागपूरसाठी रवाना होतील. तेथून रविवारी मुंबईला जातील.