December 23, 2024

“नाल्याच्या पुरात अडकलेल्या पाच शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलने सुखरुप बाहेर काढले”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७ (गडचिरोली) :  गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेले 5 व्यक्ती जोरदार झालेल्या पावसामुळे स्थानिक नाल्याला आलेल्या पूरामुळे नदी व नाल्याचे मध्ये अडकले असल्याचे तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये सुचना मिळतात तात्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकास घटना स्थळी रवाना करण्यात आले. सदरचे पथकांनी तातडीने बोटीचे तसेच शोध व बचावाचे सहाय्याने सर्व अडकलेले व्यक्तींना सायंकाळी 5.00 वाजता सुरक्षित नाल्याचे पाण्याबाहेर काढून बचाव करण्यात आला.अडकलेल्या व्यक्तीची नावे प्रमोद श्रावण बोबाटे वय 38 रा.गुरवळा,शेखर उईके वय 48 रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय 38 रा.विहीरगाव,संजय बोरकुटे वय 45 रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय 21 रा.लेखामेंढा यांचा सुरक्षित बचाव करण्यात आला. सदरचे बचाव कार्य जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीम क्रमांक 2 चे पोलिस निरीक्षक डि.जे.दाते यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपनिरीक्षक एस.डी.कराळे व त्यांचे पथक यांचे नेतृत्वामध्ये तसेच जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांचे उपस्थितीमध्ये सदरची बचाव मोहीम राबविण्यात आली या वेळी जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अक्षय भांनारकर, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी,अजित नरोटे तसेच स्थानिक गुरवळा गावातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!