“पोलीस-नक्षल चकमकीत १२ नक्षली ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७ (गडचिरोली) :
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात १२ ते १५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याची गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी १० वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये डीवाय एसपी ओपीएस च्या नेतृत्वाखाली सात सी -६० पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले. त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ६ तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना आले यश घटनास्थळावरून आतापर्यंत ३ एके ४७, २ इंसास, १ कार्बाइन, १ एसएलआर यासह ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
“सी -६० चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत.त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.”
सी -६० जवानांना बक्षीस
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री व पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी सी -६० कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.