December 23, 2024

“अज्ञात वाहनाच्या धडकेत दूचाकी स्वार जागीच ठार”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७ ; (कूरखेडा): कूरखेडा-कढोली मार्गावर गोठणगांव नाका ते मालदूगी दरम्यान अद्यात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दूचाकी स्वार इसम जागीच ठार झाल्याची घटणा आज बूधवार रोजी सांयकाळी ६ वाजेचा सूमारास घडली. मृतक इसमाचे नाव रघूनाथ तूलावी वय ५५ वर्ष रा.मालदूगी असे आहे. ते काही कामानिमीत्त गोठणगांव नाक्यावर आले होते.  परत मालदूगी कडे जात असताना त्यांचा दूचाकीला नाकतोडे यांचा ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने धडक देत पळ काढला. या अपघातात रघूनाथ तूलावी यांचा जागीच मृत्यु झाला ते आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगांव येथे संचालक होते.घटनेची माहिती मिळताच कूरखेडा पोलीसानी घटणास्थळ गाठत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे आणले.

About The Author

error: Content is protected !!