“अपघातात गंभीर जखमी पत्रकार जितेंद्र परसवानीचे नागपूर येथे दु:खद निधन”
1 min read“ब्रम्हपुरी-नागभीड रोडवर झालेल्या अपघातात झाले होते गंभीर जखमी”
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १८ ; (देसाईगंज) : नागपुर येथुन पुतणीचे लग्न आटपून १० जुलै २०२४ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास नागभीड मार्गे देसाईगंजला येत असतांना ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावरील खरबी फाट्याजवळ कारने ट्रकला दिलेल्या जबर धडकेत देसाईगंज येथील देसाईगंज समाचारचे संपादक जितेंद्र परसवानी यांच्या कुटुंबातील दोन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले होते.दरम्यान जितेंद्र परसवानी गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार्थ दाखल करण्यात आले असता १७ जुलै रोजी रात्री हार्ट अॅटॅकने दु:खद निधन झाले.
खरबी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जितेंद्र परसवानी यांचे मोठे बंधु दिलीप परसवानी व त्यांची पत्नी महेक परसवानी हे जागीच ठार झाले होते.तर
गौरव जितेंद्र परसवानी(१७ वर्षे),उदय जितेंद्र परसवाणी (१० वर्षे) ही दोन मुलं गंभीर जखमी झाले होते.तीघांवरही उपचार सुरुच असताना जितेंद्र परसवानी यांचे हार्ट अॅटॅकने दु:खद निधन परिवारावर मोठा आघात असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
विशेष म्हणजे देसाईगंज येथुन प्रकाशित करण्यात येत असलेल्या देसाईगंज समाचार या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र परसवाणी यांचे मोठे भाऊ किशोर परसवाणी हे कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथुन येत असतांना रात्रीच्या सुमारास दुचाकिला अपघात घडून जागीच ठार झाले होते. तर कुटुंबातील भावाचा मुलगा चंद्रपुर वरून देसाईगंजला येत असतांना चारकिला झालेल्या अपघातात जागीच ठार झाला होता.
या दु:खातुन परसवानी कुटुंबीय सावरत नाही तोच परत कारने ट्रकला दिलेल्या जबर धडकेत जितेंद्र परसवानी यांचा भाऊ व पत्नी हे दोघेही जागीच ठार झालेत.तर जितेंद्र परसवानी सह त्यांच्या दोन मुलांनाही गंभीर दुखापत झाली असल्याने ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात उपचार्थ भरती करण्यात आले होते.मेंदुला काहीसा मार असल्याने जितेंद्र यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.भावाचे अपघातात निधन झाल्याने संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी जितेंद्र परसरवानीच सांभाळत होते.अशातच हार्ट अॅटॅक ने जितेंद्रचही दु:खद निधन झाल्याने परिवारावर दु:खाचे पहाड कोसळले असुन त्यांच्या अशा निधनाने आप्तेष्ट, नातेवाईकांत शोककळा पसरली आहे.