“अल्पवयीन मूलीचा लैंगिक शोषणाच्या आरोपात कुरखेडा येथील यूवकास अटक”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २०; (कूरखेडा) : शहरातीलच एका अल्पवयीन मूलीला फूस लावत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा वरून येथील आझाद वार्ड निवासी शूभम सूरेश जौसीया वय २७ या यूवकाला आज अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मूलीचा अज्ञानाचा गैरफायदा घेत हा यूवक अल्पवयीन मूलीचे मागील काही महिण्यापासून लैंगिक शोषण करीत होता असा आरोप आहे. सदर बाब तिचा कूटूंबियाना समजताच त्यानी त्या यूवका विरोधात पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी शूभम याच्या विरोधात भारतिय न्याय संहिता ६४(१) ६४(२) एम.आय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. आरोपीला गून्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच तो फरार झाला होता. कुरखेडा पोलीसानी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या माहीतीवरून त्याला अटक केली.घटनेचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.