आम आदमी पार्टीकडून जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन नोंदणी करण्याचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश जिवानी यांचे आव्हान”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २०; (गडचिरोली) आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने, पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी हा शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसह मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारा एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहे. गडचिरोली जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रकाश जीवनी यांनी केले आहे.
उमेदवारी नोंदणीसाठी पात्र व्यक्तीः
- आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते
- सामाजिक कार्यकर्ते
- इतर पक्षांमधून येऊ इच्छिणारे कार्यकर्ते
- गडचिरोली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवू इच्छिणारे सर्व नागरिक
सर्व इच्छुकांनी उमेदवारी नोंदणीसाठी खालील लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरावाः
“गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 2014 च्या निकालांवरून स्पष्ट होते की जिल्ह्यात आमच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम आदमी पार्टीमध्ये सामील व्हावे,” असे आवाहन श्री. प्रकाश जिवानी, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, गडचिरोली यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. प्रकाश जिवानी , जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, जिल्हा गडचिरोली , फोन: 9823569500