December 23, 2024

“गोठणगांव चेकपोस्ट येथे आरोग्य कैंप स्थापित करा ; आप ची मागणी”

1 min read

कुरखेडा ; जुलै २१ : तालुका मुख्यालयात सती नदीपलीकडे अपघात व गंभीर रुग्णांना प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे आरोग्य कॅम्प स्थापित करावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निवेदनातून केले आहे.

कुरखेडा सती नदी वरील पुलाचे बांभकाम सुरू असल्याने या मार्गावरील रपटा पुरात वाहून गेल्याने रहदारी बंद असून आंधळी वळण मार्गाने १५ किलोमीटर फेरा होत असून मागील १५ दिवसात आरोग्य मदत वेळेवर उपलब्ध नझाल्याने दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला. लोकांना वेळीच आरोग्य सुविधा मिळावी व त्यांचा जीव वाचविता यावा या करीता २४ तास आरोग्य अधिकाऱ्या सह रुग्णवाहिका गोठणगाव चेकपोस्ट येथे उपलब्ध करावी अशी निवेदनात मागणी केलेली आहे. शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या युवकाला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. परिणामी त्याला जीव गमवावा लागला. एका दुचाकी स्वारास अपघात होवून सुमारे ४ तास रुग्णवहिका उपलब्ध झाली नाही. परिणामी त्यालाही जीव गमवावा लागला.

या सर्व घटनांपासून एक विषय स्पष्ट आहे की, रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात पोहचविणे करिता होणाऱ्या विलंबामुळे नाहक जीव गमवावा लागत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे वैद्यकीय अधिकाऱ्यासह रुग्णवाहिक उपलब्ध झाल्यास आरोग्याशी संबंधित सेवा तत्काळ उपलब्ध होतील.

खासदार डॉ. नामदेव कीरसान यांना निवेदन सादर करतांनी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकूर, उपाध्यक्ष दीपक धारगाये , मीडिया प्रमुख शहजाद हाश्मी,  युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रांजल धाबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!