April 25, 2025

मान्सूनपूर्वी सूचना करुन ही सांडपाण्याची व्यवस्था नगर पंचायत कुरखेडा यांनी केली नाही ; रमेश गोन्नाडे यांचा आरोप

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २१ ; (कुरखेडा) : येथील रहिवासी असलेले रमेश गोन्नाडे यांनी ६ जून २०२४ रोजी नगर पंचायत प्रशासनास लेखी तक्रार करून सांडपाण्याची व्यवस्था   करण्याचे निवेदन केले होते. सदर निवेदन सादर करुन ही कोणतेच उपयोजन नकेल्याने अतिवृष्टी मुळे घानपाणी घरात घुसून मोठ्याप्रमाणत नुकसान झाले आहे.

कुरखेडा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना रमेश गोन्नाडे यांनी लेखी निवेदन सादर केला होता परंतु प्रशासन व पदाधिकारी यांनी त्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केला परिणामी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे त्यांच्या मुख्यरस्त्या लगत असलेल्या घरात गुडघाभर पाणी साचला. सदर पाणी घरात शिरल्याने येथे वास्तव्य करणाऱ्या लोकांचा मोठ्याप्रमाणत नुकसान झालं. महामार्गाची मुख्यानाली बांधकाम झाल्यानंतर जोडनाल्या व्यवस्थित केल्या असत्यातर ही परिस्थिती उद्भवली नसती.

नगरपंचयात प्रशासनाने आतातरी त्यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेवून नाल्या मधील अडथळे दूर करावे अशी मागणी केली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!