गरोदर महिलांना प्रसूतीसाठी गडचिरोलीला नेताना रुग्णवाहिका आंधळी नवरगावच्या मुख्य रस्त्यालगत फसली”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २१ (कुरखेडा) : कुरखेडा येथील सती नदीच्या पुलीयाचे बांधकाम पुर्ण न झाल्याने वाहतुक आंधळी नवरगाव गावातून वळती करण्यात आलेली आहे. गावचे रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून शनिवारी २० जुलै रोजी रात्रो ७.३० वाजताच्या सुमारास गरोदर महिलांना प्रसूतीसाठी गडचिरोलीला नेताना रुग्णवाहिका मुख्य रस्त्यालगत फसली. गावातील नागरिकांनी ट्रक्टरच्या साह्याने रुग्णवाहिका काढण्यास सहकार्य केले, यात अर्ध्या तासा पेक्षा अधिक वेळ खर्च झाला सुदैवाने कुठलीच दुखापत गरोदर महिलांना झाली नाही.
आंधळी मार्गे वाहतूक वाढल्याने सुरळीत आवागमन सुरु राहत नाही. तसेच चार चाकी वाहन येण्याजाण्याकरिता रोज खोळंबा होत असतो. गावातील रस्ता अरुंद असल्याने मोठा जाम लागलेला असतो. वाहतुक नियंत्रणसाठी ट्राफिक पोलिसाचे नियोजन करावे तसेच तात्काळ मुख्य रस्त्याचा बाजूचे खड्डे बुजवून रस्ता रुंद करावे. परिसरात मदत केंद्र स्थापन करून तात्काळ मदत देण्यात यावी. अशी मागणी आंधळी येथील उपसरपंच अप्रव भैसारे यांनी केली आहे.