सतीनदीच्या वाहतूक खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार – खासदार डॉ. नामदेव कीरसान यांचा आरोप
1 min readकूरखेडा; जुलै २२: सतीनदीचा पूलाचे बांधकाम रखडल्याने तसेच पर्यायी वाहतूकी करीता बांधण्यात आलेला रपटा सूद्धा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत विद्यार्थी,रूग्न,तसेच ग्रामस्थाना तालुका मूख्यालय गाठणे कठीन झाले आहे या वाहतूकीच्या खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार आहे असा आरोप खासदार डॉ. नामदेव कीरसान यानी केला आहे.
खा.डॉ. नामदेव कीरसान यानी रविवार रोजी कूरखेडा येथे पोहचत पूलाचे अर्धवट बांधकाम व खचलेल्या रपट्याची पाहणी केली तसेच बांधकाम कंपनीचा अधिकार्याना नागरीकाना होणार्या असूविधे बाबद कान उघाडणी करीत या वाहतूकीचा खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप केला.
शहरालगत असलेल्या सतीनदी घाटावर नविन पूलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते यावेळी जूना पूल तोडण्यात आला पण पावसाळा सूरू होण्यापूर्वी नविन पूलाचे बांधकाम पूर्ण होईल अशी कोणतीच खबरदारी कंत्राटदार व संबंधित विभागाने न घेतल्याने परीसरातील अनेक गावातील शालेय विद्यार्थी,रूग्न,नागरीकाना त्रास सहन करावा लागत आहे पर्यायी वाहतूकी करीता बांधण्यात आलेला रपटा सूद्धा पाण्याचा प्रवाहात टिकेल असा तांत्रिक दृष्ट्या मजबूत बांधण्यात न आल्याने तो पहिल्याच पावसात वाहून गेला तसेच १५ ते २० कीलोमीटर लांब अंतराचे असलेले आंधळी व अंतरगाव मार्ग हे सूद्धा अरूंद व नादूरूस्त असल्याने या मार्गाने बस सेवा अद्याप सूरू होऊ शकले नाही त्यामूळे शैक्षणिक नूकसान होत आहे याकरीता प्रशासनाने तातडीने पावले उचलत विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान टाळण्याकरीता पर्यायी मार्गावर बस सेवा सूरू करण्यात येणारी अडचण दूर करावी अशी सूचणा त्यानी यावेळी उपस्थीत नायब तहसीलदार शाहीद शेख बांधकाम कंपनीचे प्रोजेक्ट मेनेजर नंदकिशोर ठाकूर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक साहायक स्वामी याना केली यावेळी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे माजी आमदार आनंदराव गेडाम, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकूर, मीडिया प्रमुख शहेजाद हाश्मी, कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, रामदास मसराम, सामाजिक कार्यकर्ता डॉ शिलू चिमूरकर कांग्रेस आदिवासी सेलचे प्रदेश सचिव छगन शेडमाके कीसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे नगराध्यक्ष अनीताताई बोरकर,माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी माजी प स सभापती गिरीधर तितराम, नगरसेवक आशिष काळे नगरसेवीका आशा तूलावी, आनंदराव जांभूळकर, जावेद शेख शहर वासीय उपस्थीत होते.