December 23, 2024

“बचाव पथकाच्या मदतीने जिल्ह्यात अनेकठिकाणी आपदग्रस्तांना मदत”; “दुर्घटना टाळण्यात यश”

1 min read

गडचिरोली , जुलै २४ : जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातील विसर्गामुळे नदी नाले दुथळीभरूण वाहत आहेत. यातच आपदग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची बचाव पथके धावून जात आहे. पूरात वेढलेल्या आणि पुरामुळे आरोग्य सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्याने अडचणीत सापडलेल्या विविध प्रकरणात आज SDRF/पोलिस/महसूल/आरोग्य/आपदा मित्र यांचा समावेश असलेल्या बचाव पथकाच्या तत्परतेने दुर्घटना टाळण्यात यश आले.
तेलंगणा राज्यातील आशिफाबाद येथील श्रीमती कलावती, वय 20 ह्या गर्भवती महिला मौजा, चिक्याला, ता. सिरोंचा येथे नातेवाईकडे आल्या असता काल रात्री अचानक त्यांना प्रसुती वेदना होवू लागल्या. परराज्यातून आलेल्या असल्याने जिल्हा प्रशासनाकडील मान्सुनपुर्व नोंदणी केलेल्या गर्भवती स्त्रियांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र रात्री उशीरा याबाबत माहिती मिळताच स्थानिक महसूल/आरोग्य बचाव पथकाने वेळीच त्यांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढत चिक्याला ते परसेवाडा व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा येथे स्थलांतरीत केले. वैद्यकीय उपचार व देखरेखीखाली मध्यरात्री 1.45 वाजता त्यांची नॉर्मल प्रसूती झालेली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात श्रीमती कल्पना सचिन परसे वय 32 रा. माडेमूल, ता. गडचिरोली यांना आज सकाळी सर्पदंश झालेच्या संशयवरून जिल्हा बचाव पथकाच्या टीम ने पुराच्या वेढ्यामुळे रस्ता बंद असल्याने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून महिला आता सुरक्षित आहे.
मूलचेरा तालुक्यातील मौजा वेंगणुर येथील पायल गावडे, वय 23 वर्ष, या गर्भवतीला छातीत दुखत असल्याबाबत स्थानिक आशा वर्कर यांनी कळविले. नंतर सदर महिलेला स्थानिक मूलचेरा/एटापल्ली येथील सयूंक्त आरोग्य/महसूल पथकाद्वारे सुखरुपरित्या बाहेर काढुन पुढील उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी ह्या सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे.
चौथ्या प्रकरणात गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील पाल नदीवरील पुलावरील पाणी जमा झाले होते. पाण्याचे अंदाज न आल्याने एक ट्रकचालक वाहनासह या पुलावर अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार/पोलीस निरीक्षक गडचिरोली, SDRF/पोलीस पथक ह्यांच्या साहाय्याने सदर वाहनचालक राजकुमार कृष्णमूर्थी, जिल्हा एलियार, राज्य तामिळनाडू ह्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले.

खड्डे बुजविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
जिल्ह्याच्या दक्षिण भागात महाराष्ट्र – तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाजवळ (वांगेपल्ली) गावात रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना याबाबत माहिती मिळताच ते प्रत्यक्ष ठिकाणावर उपस्थित राहून त्यांनी बांधकाम विभागामार्फत जेसीबी, ट्रॅक्टर च्या सहाय्याने बोल्डर, गिट्टी टाकून तात्काळ तेथील खड्डे बुजवून घेतले. यासोबतच या भागात रस्त्यावर पडलेले इतरही खड्डे तात्काळ बुजविण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले.

About The Author

error: Content is protected !!