“गडचिरोली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या १४५ होमगर्डचा अनुशेष भरणे करिता होमगार्ड नोंदणी सुरू”

गडचिरोली, जुलै २४: गडचिरोली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 145 होमगर्डचा अनुशेष भरणे करिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16/08/2024 पासुन पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे केले आहे. याकरिता दिनांक 25/07/2024 ते 14/08/2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहीतीपत्रक नियम व अटी बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेष मध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड गडचिरोली यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या गडचिरोली जिल्हयातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक, गडचिरोली, कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी केले आहे.