“गोंडवाना सैनिकी विद्यालयात सत्र २०२४-२५ करिता शालेय मंत्रिमंडळ गठीत”
1 min readगडचिरोली , जुलै २५: स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात सत्र २०२४-२५ करिता शालेय मंत्रीमंडळ गठीत करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांमधून शाळा नायक पर्यावरण मंत्री, स्वच्छता मंत्री, क्रीडा मंत्री, मेस मंत्री, सांस्कृतिक प्रमुख इत्यादी पदांची प्रात्यक्षिक पद्धतीने निवड करण्यात आली. निवडणूक हि दोन स्तरामध्ये घेण्यात आली, यामध्ये प्राथमिक हाऊस स्तर तर द्वितीय शालेय स्तर अशाप्रकारे आयोजित करण्यात आली होती.
प्राथमिक स्तरातील निवडणूक हि विद्यालयातील एकूण चार हाऊस करिता घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक हाऊस करिता हाऊस कॅप्टन, स्वच्छता प्रमुख, क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख, शिस्त प्रमुख इत्यादी पदांकरिता निवडणूक घेण्यात आली तर दुसऱ्या स्तरात शालेय मंत्रिमंडळ करिता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये प्राथमिक स्तरातील भगतसिंग हाऊस करिता अनुराग प्रकाश लेकामी, चंद्रशेखर आझाद हाऊस करिता दिशांत दिलीप भुरले, सुभाषचंद्र बोस हाऊस करीत सोहम विजय जेंगठे तर वीर सावरकर हाऊस करिता कृष्णकांत सुरेश भांडेकर हे हाऊस कॅप्टन म्हणून निवडून आले. तर दुसऱ्या स्तरातील निवडणुकीमध्ये विद्यालयातून सर्वाधिक मते घेऊन वर्ग ११ विचा कॅडेट मास्टर श्रीकांत वरगंटीवार हा शाळा नायक म्हणून तर वर्ग ९ वि चा क्रिष्णा आंबोरकर व वर्ग ८ वि चा वेदांत चापले हे शाळा उपनायक म्हणून निवडून आले. निवडून आलेल्या उमेदवारांनि शपथ ग्रहण सोहळ्यादरम्यान विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्य करून सर्वांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रसंगी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे, विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच चारही हाऊस चे हाऊस मास्टर प्रशांत म्हशाखेत्री, संतोष कुळमेथे, शंकर दासरवार, किशोरलाल साठवणे व सैनिकी निदेशक ऋषी वंजारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी कार्य सांभाळले.