“सुरक्षा भिंत खचली; जांभळी – सोनेरंगी मार्गावर प्रवास करणे झाले धोकादायक”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २७: कुरखेडा तालुक्यात स्ततधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त आहे. अश्यातच
26 जुलै रोजी जांभळी – सोनेरांगी मार्गावर बांधण्यात आलेली सुरक्षा भिंतच पाण्यात वाहून गेल्याने हा मार्ग धोकादायक झालं असून परिसरातील सुमारे ५० एकर शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याच्या पुराचे पाणी जावूनये यासाठी रस्त्यालगत नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्यात आलेली होती. सदर सिमेंट काँक्रीट ने बांधण्यात आलेली भींत कोसळल्याने नाल्याच्या नाल्याच्या प्रवाहात रस्त्यालगत माती वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला असून निम्म्यापेक्षा अधिक रस्ता वाहून गेलेला आहे.
सुमारे 3 ते 4 वर्षा पूर्वी बांधण्यात आलेली भिंत दर वर्षी दुरुस्ती करुन ही पुरात टिकली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी व नाल्याच्या पुरात वाहून जाणारे झाडाचे खोड शेतात आल्याने पिकांचे मोठे नुसान झालेले आहे. रस्ता बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.