April 27, 2025

“पोलिस भरतीच्या परीक्षेला गडचिरोली येताय; चिंता नको, तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलीय उमेदवारांच्या निवाऱ्याची व्यवस्था”

गडचिरोली,जुलै २७: रविवारी २८ जुलैला गडचिरोली येथे पोलिस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी मोफत निवास आणि भोजनाची सोय केली आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात तनुश्री धर्मरावबाबा आत्राम आणि सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नवेगाव कॉम्प्लेक्स येथील सृष्टी सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथील पटेल मंगल कार्यालय व इंदिरानगर येथील स्पप्नील मडावी अकॅडमी येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे. लेखी परिक्षेसाठी येणाऱ्या युवक, युवतींनी तनुश्री आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय(8275877177), स्वप्नील मडावी(9529933893), उमेश उईके(8999956573), कुणाल कोवे(9284658547),सतीश कुसराम(7498462079) तसेच जयश्री येरमे व रेखा तोडासे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

“रविवारी २८ जुलैला लेखी परीक्षा”

गडचिरोली पोलिस दलातर्फे ९१२ पोलिस शिपाई पदांकरिता मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या ६७११ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी २८ जुलैला गडचिरोली शहरातील ११ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी सकाळी ८ वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. ‘सामान्य अध्ययन’ या विषयाचा पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजता, तर गोंडी व माडिया भाषेचा दुसरा पेपर दुपारी १.३० ते ३ वाजतापर्यंत घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपापले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र असणाऱ्या उमेदवारांना बॉयोमेट्रीक पद्धतीने नोंदणी परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. बॅग, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रानिक्स वस्तू घेऊन परीक्षा कक्षात जाता येणार नाही, असे पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!