April 27, 2025

हिपॅटायटीस आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार

*तपासणी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन*

गडचिरोली, जुलै २९ : जिल्हयातील हिपॅटायटीस बी व सी च्या रुग्णांनी घाबरण्याची अजिबात गरज नसून या आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या नातवाईकांनी तपासणी करावे व उपचार नियमित घ्यावे जेणेकरुन पुढील गुंतागुत जसे यकृत पुर्णपणे खराब होणे, यकृताचे कॅन्सर होणे थांबविता येईल करीता दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी रक्त तपासणी करावी व या आजारांचे लसीकरण करुन घ्यावे असे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हामध्ये सुरु करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत राज्यात ४ आदर्श उपचार केद्रं व २२ उपचार केद्रं यांची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर केद्रामार्फत रुग्णाची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हिपॅटायटीस या आजाराबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी जागतीक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी हिपॅटायटीस दिनाचे “It Time for Action” घोषवाक्य प्रसिध्द केलेले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित पंधरवाडा २२ जुलै ते ३ ऑगष्ट या दरम्यान साजरा करण्याबाबत सूचित केले आहे.
या अनुषंगाणे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस पंधरवाडा निमित्त 29 जुलै रोजी डायलेसिस विभागातील डायलेसिस रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डायलेसिस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
सदर शिबीरामध्ये रुग्ण व नातेवाईक व कर्मचारी यांचे रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य्‍ अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी, डॉ.प्रफुल हुलके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे, भिषक (वर्ग-1) डॉ. मनिष मेश्राम आदी उपस्थित होते.
सदर शिबीर आयोजीत करण्याकरीता RBSK & NVHCP जिल्हा समन्वयक, औषधी निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, HIV-AIDS विभाग, रक्तपेढी विभाग तसेच कार्यालयातील कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरीचारीका इत्यादीनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!