April 25, 2025

“गेवर्धा आविका संस्थेवर सावकार गटाचे वर्चस्व”

  • “मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात किस्मत आजमावत असलेली शेतकरी पैनलने केली चूरशीची लढत”
  • “चूरशीच्या लढतीत १३ पैकी १० जागेवर सावकर गटाचे विजय तर शेतकरी विकास पैनलचे ३ विजयी

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, जुलै ३१; (ताहिर शेख) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गेवर्धा येथील पंचवार्षिक निवडणूकीत पोरेड्डीवार सावकार गटाने वर्चस्व कायम ठेवत चूरशीचा लढतीत १३ पैकी १० जागेवर विजय मिळविला तर पहिल्यांदाच सावकार गटाला टक्कर देत चुरशीची लढत बनवत शेतकरी विकास पैनल चे ३ जागेवर समाधान मानावे लागले. ३० जूलै मंगळवार रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली यानंतर लगेच मतमोजणी करीत सांयकाळी ७ वाजता निकाल घोषित करण्यात आला.
चूरशीच्या लढतीत बिगर आदिवासी कर्जदार गटातून गटनेते व्यंकटी नागीलवार व मानिक गायकवाड यानी विजय मिळविला तर सर्वसाधारण आदिवासी कर्जदार गटातून शिवलाल कवडो,सिताराम गावळे, तूकाराम नहामूर्ते,अनिराम बोगा,व देवनाथ मरस्कोल्हे यानी तर विरोधी गटाचे प्रभाकर कूळमेथे यानी विजय मिळविला. अनूसूचित जाति जमाती गटातून परसराम लाडे व महिला राखीव गटातून शामलता आळे व रूपाली पूसाम यानी विजय संपादन केला. इतर मागास प्रवर्ग गटातून विरोधी गटाचे सूधिर बाळबूद्धे तर भटक्या विमूक्त जाती जमाती गटातून जनार्धन डोगंरवार हे विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यानी जवाबदारी पार पाडली. संस्थेचे व्यवस्थापक मस्के यानी सहकार्य केले. विजयाची घोषणा होताच जिल्हा बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार,  गटनेता व्यंकटी नागीलवार, जावेद शेख, एड. उमेश वालदे, नरेश पूसाम, श्रीकांत नागीलवार यांच्या नेतृत्वात विजय उत्सव साजरा करण्यात आला. शेतकरी विकास पैनल चे विजयी , पराभूत उमेदवारांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!