“वाघेडा-मालदूगी वर्दळीचा मार्गावर खड्डेच खड्डे, तत्काळ दुरुस्ती करुन देण्याची मागणी”
1 min readकूरखेडा; जुलै ३०: सतीनदीचा रपटा वाहून गेल्याने सद्या वर्दळीचा ठरत असलेला वाघेडा ते मालदूगी दरम्यानचा २ कीलोमीटरचा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्याची तातडीने दूरूस्ती कार्यवाही करण्याकरीता माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यानी आमदार कृष्णा गजबे यांचा मार्फत संबंधित विभागाकडे पाठपूरावा सूरू केला आहे.
सतीनदीचा पूलाला तोडत तिथेच नविन पूलाचे बांधकाम सूरू आहे. यावेळी पर्यायी म्हणून वाहतूकी करीता बांधण्यात आलेला रपटा सूद्धा पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने या मूख्यमार्गावरील वाहतूकच ठप्प झालेली आहे. त्यामूळे सद्या येथील वाहतूक आंधळी,वाघेडा,मालदूगी या मार्गाने वळविण्यात आलेली आहे. पूर्विच हा मार्ग अरूंद व नादूरूस्त होता. सद्या या मार्गावर वर्दळ वाढलेली आहे तसेच अतिवृष्टि मूळे वाघेडा ते मालदूगी दरम्यानचा दोन कीलों मीटर अंतरावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. येथून वाहन चालकाना मार्गक्रमण करने कठीन झाले आहे. हा दोन कीलोमीटर अंतर घनदाट जगंलातून गेलेला आहे येथे बिबट व अन्य जगंली हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे. येथे रात्री बेरात्री खड्ड्यामूळे अपघाताची शक्यता किंवा वाहन बंद पडत जगंली हिंस्त्र प्राण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामूळे या दोन कीलोमीटर अंतराचा मार्गाची तातडीने दूरूस्ती करण्यात यावी याकरीता माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यानी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांचा मार्फत संबंधित विभागाकडे पाठपूरावा सूरू केला आहे. लवकरच या मार्गाची दूरूस्ती कार्यवाही सूरू करण्यात येईल असे आश्वासन संबधितानी दिली असल्याची माहिती रविन्द्र गोटेफोडे यानी दिली आहे.