April 25, 2025

‘सर्च’ दवाखान्यात २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर; मुंबईचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक करणार कान व नाक शस्त्रक्रिया ; नाव नोंदणी सुरू

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , जुलै ३१ (धानोरा ) : तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. वारंवार कान फुटणे, कानातून पस/पू निघणे, नाकाचे हाड वाकडे होणे, नाकातील मास वाढणे, नाकाचे हाड वाढणे ही लक्षणे असल्यास  शस्त्रक्रिया करण्यात येतील. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजिव नेरूळकर MS (ENT) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जरी कॅम्प घेण्यात येत आहे.

डॉ. राजिव नेरूळकर हे मुंबई येथील प्रसिद्ध ईएनटी सर्जन आहेत. मागील २३ वर्षापासून ईएनटी सर्जन म्हणून काम करीत आहेत आणि या क्षेत्रात त्यांनी प्रगल्भ कौशल्य आणि ज्ञान मिळविले आहे. गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन खर्च पुर्णपणे मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी २३ ते २४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार्‍या ई.एन.टी. सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून घ्यावी व सर्जरी करिता आपले नाव नोंदवून घ्यावे. प्रथम येणार्‍या रुग्णास प्राधान्य दिल्या जाईल. सर्जरी करिता नाव नोंदणी सुरू आहे. येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. असे आवाहन सर्च तर्फे करण्यात आले आले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!