December 22, 2024

“लोकशाही दिनाचे ५ ऑगस्टला आयोजन”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ३१ : ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यत राहील. आणि सभेला ३.०० वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!