December 23, 2024

“पदमश्री डॉ. परशुराम खुणे यांना ‘कला’ या वर्गवारीत विधान परिषदेवर सदस्य म्हणून घेण्यासाठी सर्वस्तरावरून मागणी”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट १; (प्रतिनिधी)  पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांना मागच्या वर्षी सन २०२३ ला भारत सरकाने नाट्यकला क्षेत्रातील कार्याची दखल घेवुन प‌द्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदान बघता महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर ‘कला’ या वर्गवारीत विधान परिषदेवर सदस्य म्हणून घेण्यासाठी सर्वस्तरावरून मागणी जोर धरत आहे.

गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने मा. राज्यपाल महोदय यांचेकडे ‘कला’ या वर्गवारीत विधान परिषदेवर निवड करण्यासाठी नावाची शिफारस करावी अश्या मागणीचा पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला आहे. त्यांनी आपल्या पत्रात फडणवीस यांना संबोधून असे म्हटले आहे की, आता पर्यंतचे अर्ध्या पेक्षा अधिक आयुष्य हे भारतिय जनतापार्टी व संघ विचाराशी जुडलेले आहे. तसेही गडचिरोली जिल्हयात १०० टक्के आरक्षण असल्यामुळे ओ.बि.सी. यांना कुठल्याही राजकिय निवडणुकीत उभे राहता येत नाही. तसेच ओ.बी.सी. कोहळी समाज पुर्व विदर्भातील पाच जिल्हयात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. तसेच झाडीपट्टी रंगभूमी वरील कलावंत व नाटय रसिक जवळपास १५० नाटय कंपन्या अस्तित्वात आहेत. विधान सभेवर डॉ. खुणे यांची निवड झाल्यास मोठा जनआदेश भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहील व त्याचा फायदा समोर येणाऱ्या विधान सभेला निवडणुन येण्यास सहकार्य मिळेल. तमाम ओ.बि.सी. बांधव व नाटय कलावंत निर्माते यांचे पाठबंळ मिळेल. गडचिरोली जिल्हयाचे पालक मंत्री या नात्याने आपण राज्यपाल कोटयातुन विधान परिषदेच्या सदस्य पदी कला या वर्गवारीत डॉ. परशुराम खुणे यांचता नावाची शिफारस करावी अशी भावनात्मक विनंती केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष  प्रणय एल. खुणे यांनी ही विधान परिषदेवर सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे पदमश्री डॉ. परशुराम कोमाजी खुणे यांचा नावाचा विचार विधान परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात करिता करण्यात यावा अशी लेखी विनंती देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे. पदमश्री डॉ. परशुराम कोमाजी खुणे हे झाडीपटी रंगभुमीवरील लोकप्रिय कलांवत आहेत त्यामुळे बऱ्याच रंगकर्मीची साथ पक्षाला फायदेशीर ठरणार आहे. याच गोष्टीचा विचार करून मागील सरकारने काँगेस तर्फे झाडीपटीच्या एका कलावताच्या नावाची शिफारस केलेली होती म्हणून आपण सुध्दा या सगळ्या गोष्टीचा विचार करून पदमश्री डॉ. परशुराम कोमाजी खुणे यांना विधान परिषदेवर सदस्य माणून घेण्यासाठी मा. राज्यपाल महोदय याच्याकडे शिफारस करावी अशी सकल भाजपा कार्यकर्तीच्या वतीने व तमाम झाडीपट्टी रंगभूमीच्या कलांबताच्या वतीने  विनंती केलेली आहे.

कोहळी समाज विकास मंडळ, नागपूर चे अध्यक्ष प्रकाश एच. बाळबुधे यांनी ही पदमश्री डॉ. परशुराम खुणे यांना “कला” या वर्गवारीतून राज्यपाल कोट्यातून विधान परिषद वरील नेमणुकीस हिरवी झेंडी द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांचेकडे केलेले आहे.

डॉ. परशुराम कोमाजी खुणे यांचा परीचय”

संपूर्ण नाव – डॉ. परशुराम कोमाजी खुणे , पद्मश्री भारत सरकार

जन्मतारीख – 22/02/1952

निवास पत्ता :- गुरनोली पो. गेवर्धा ता. कुरखेडा जि. गडचिरोली.

शिक्षण :- डी. एच. एम. एस.

भ्रमणध्वनी :-9420846242

कला व सामाजिक क्षेत्रात योगदान :-

  1. 50 वर्षापासुन झाडीपट्टी नाट्य रंगभुमीवर कार्यरत.
  2. 800 विविध नाटकातून भूमीका.
  3. 5000 पेक्षा नाट्य प्रयोगातून सादरीकरण.
  4. विनोदी नट म्हणून प्रसिध्द.
  5. 10 वर्षे झाडीपट्टी नाट्य अकादमी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
  6. 15 वर्ष गुरनोलीचे सरपंच म्हणुन व 5 वर्षे उपसरपंच म्हणून कार्यभार सांभळला.
  7. 30 वर्षापासुन जादुच्या प्रयोगातून अंधरश्रध्दा निर्मुलाचे कार्य सुरु आहे.

मिळालेले सन्मान सत्कार , पुरस्कार :

1) सन 1991 शेतील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या” शेतीनीष्ठ” पुरस्काराने सन्मानीत.

2) 1992 स्व. सुनिल भावसार जादुगार” पुरस्कार.

3) 1993 स्व. शामराव बापु प्रतिष्ठाना तर्फे ” कलागौरव ” पुरस्कार.

4) 1994 अखील भारतीय नेहरु युवा केंद्रा तर्फ मद्रास इथे भरलेल्या युथ वेलफेअर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जिल्ह्यातुन निवड.

5) 1995 मानोरा इथे झालेल्या नाट्य कलावंत मेळाव्यात सिनेतारका अल्का कुबल आठले यांचे हस्ते स्मृती चिन्ह देवून सत्कार.

6) 1996 नागपुरच्या मानव मंदौरा तर्फे ” स्मिता- स्मृती ” पुरस्कार.

7) 1997 ग्रामीण सांस्कृतिक रंगभुमी नागभीड तर्फे सिनेतारीका स्मिता तवळकर यांच्या हस्ते सत्कार.

8) 1997 नाट्यकलांवत मेळावा नेरपरसापंत इथे सिनेस्टार मोहन जोशी यांचे हस्ते सत्कार.

9) 1999 साईबाबा नाट्य कला मंडळ, दिघोरी तर्फे सानेतारका अल्का कुबल आठल्ये वांचे हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार.

10) 1999 महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग मुंबई तर्फे चंद्रपुर इथे सिनेस्टार मोहन जोशी यांचे हस्ते सत्कार.

11) दलित रंगभुमी आरमोरी तर्फे ” कलापुरस्कार”

12) 2001 झाडीबोली साहित्य परिषद तर्फे ” कला वैभव ” पुरस्कार.

13) 2001 लोकमत त्रिदशकपुर्ती निमीत्याने दै. लोकमत समुहातर्फे सत्कार,

14) 200। लोकमत कलादर्पण राजुरा तर्फे इथे होणाऱ्या पहिल्या झाडीपट्टी सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड.

15) 2003 अखिल झाडीपट्टी नाट्य अकादमीचे अध्यक्ष म्हणुन एक मताने निवड.

16) 2006 मौलाना अब्दुल कलाम आजाद, ऑफ इंडीया तर्फे उत्कृष्ठ कलावंत पुरस्कार.

17) 2007 गुरनोली गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणुन निवड.

18) 2008 युवा समुह प्रकाशन वर्धा तर्फे राज्यस्तरीय गौरव पुरस्कार.

19) 2008 मातंग समाज औरंगाबाद तर्फे नामे अन्नाभाऊ साठे ” कलाभूषण ” पुरस्कार,

20) 2009 महात्मा फुले समता परिषद तर्फे झाडीपट्टी” कलाभुमी” पुरस्कार.

21) 2012 राष्ट्रीय जादु परिषद पुणे तर्फ जादुगार गौरव पुरस्कार.

22) 2012 षष्टापदी पुती निर्मात्याने डी परशुराम खुणे फैन्स क्लब तर्फ नाहीर सत्कार.

23) 2012 सुजन चंद्रपुर प्रस्तुत कला दरबार मध्ये स्मृतीचिन्ह देवून सन्मानीत.

24) 2013 प्रेस क्लब गडचिरोली तर्फ गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित.

25) 2013 भारतीय लोककला महासंघा तर्फे जिल्हा प्रतिनीधी म्हणून निवड.

26) 2013 अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन कुरखेडा तालुका अध्यक्ष म्हणून निवड.

27) 2013 भारतीय लोककला महासंघा तर्फे जिल्हा प्रतिनीधी म्हणून निवड.

28) 2014 पंढरपुर येथे 2 फेब्रुवारीला 94 व्या झालेल्या नाट्य संमेलनात अखिल भारतीय नाट्ध परिषद मुंबई तर्फ मा ना सुशिलकुमार शिंदे साहेब केंद्रीय गृहमंत्री, साहेब, यांचे हस्ते स्मृती चिन्ह देवून सत्कार.

29) 2014 महाराष्ट्र राज्य शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई तर्फे ” कलादान” पुरस्काराने सन्मानित.

30) 2014 कला सांस्कृतिक मंच भा.ज.पा.स. मुंबई तर्फे संयोजन कला सांस्कृतिक सेल भा.ज.पा. जि. गडचिरोली म्हणून निवड.

31) 2015 नुसार स्वर आराध्य संगीत प्रतिष्ठान नागपुरच्या वतीन” स्वरराज्य छोटा गंधर्व स्मृती नाट्य रंगकर्मी ” गौरव.

32) 2016 सुमन नारायण प्रतिष्ठान इटखेडा तर्फे नटवर्य नारायण मेश्राम नाट्य गौरव पुरस्काराने सन्मानीत.

33) 2016 केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डावर सुचना आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार तर्फ सदस्य म्हणून निवड.

34) 2018 अखिल नाट्य नागपुर परिषद तर्फे झाडीपट्टी जेष्ठ रंगकर्मी” पुरस्काराने सन्मानित.

35) 2018 राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था जोगी साखरा तर्फे नट सम्राट गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित.

36) 2020 नेहरु युवा केंद्र गडचिरोली व महात्मा जोतीबा फुले युवा परीवर्तन तर्फे जिवन गौरव पुरस्कार” सन्मानित.

37) 2022 समाज भुषन पुरस्कार महाराष्ट्र राज्य.

38) 2023 पद्मश्री पुरस्कार भारत सरकार.

39) 2023 नाट्य परिषद शाखा मुंबई मा. ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार.

40) 2023 के. वसंतराव नाईक ट्रस्ट तर्फे मुंबई येथे राजभवनात मा. राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार.

गाजलेले नाटक :

  1. सिंहाचा छावा,
  2. स्वर्गावर स्वारी,
  3. संगित महानंदा,
  4. लावणी भुललो अभंगाला,
  5. एलकोड मल्हार,
  6. लग्नाची बेडी,
  7. व्यथा एका संसाराची,
  8. एकच प्याला,
  9. भुकंप,
  10. नाथ हा माझा,
  11. नवा संसार,
  12. ज्यालामुखी,
  13. भुक इत्यादी….

मराठी सिनीमे :-

  1. पहिले पाऊल जिवनाचं,
  2. रंग माझा वेगळा,
  3. निबंध इत्यादी….

About The Author

error: Content is protected !!