आतापर्यंत जिल्ह्यात 162 टक्के पाऊस, सर्वाधिक 1184 मिमी कुरखेडा तालुक्यात बरसला
1 min readकोणत्या तालुक्यात किती प्रमाण? वाचा
तालुकानिहाय पडलेल्या पावसावर एक नजर टाकल्यास सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक, म्हणजे 183.9 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. मात्र प्रत्यक्षात झालेले पर्जन्यमान पाहता सर्वाधिक 1184 मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात कोसळला आहे.
तालुकानिहाय प्रत्यक्ष बरसलेला पाऊस खालीलप्रमाणे आहे.
गडचिरोली 1173.8 मिमी (160.3 टक्के), धानोरा 1122.9 मिमी (140.2 टक्के), देसाईगंज 1166 मिमी (171.3 टक्के, आरमोरी 1051.2 मिमी (169.8 टक्के) कुरखेडा 1184.9 (154 टक्के), कोरची 951.2 मिमी (129.2 टक्के), चामोर्शी 817.1 मिमी (165.7 टक्के), मुलेचरा 989 मिमी (156.1 टक्के), अहेरी 866.8 (136.5 टक्के), सिरोंचा 1005.9 (183.9 टक्के), एटापल्ली 971.1 मिमी (140.5 टक्के), भामरागड 1179.7 मिमी (176.5 टक्के)