December 23, 2024

“उद्या गडचिरोली येथे व्हॉईस ऑफ मिडियाचे एक दिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशन”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट ०३ :  लोकशाहीचा चौथा आधास्तंभ समजला जाणाऱ्या वृत्तपत्राला आकार देणाऱ्या पत्रकारांच्या विविध समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा या धर्तीवर व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीच्या वतीने उद्या रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी गोंडवाना सैनिकी शाळा चामोर्शी रोड गडचिरोली येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पत्रकारांचे एक दिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजे धर्मरावबाबा आत्राम हे राहणार असून, उद्घाटन गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते पार पडणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल पाटील मस्के हे आहेत. तर विशेष अतिथी म्हणून विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, राज्य कार्यकारी सदस्य संजय पडोळे, लोकमत न्युज १८ चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १० वाजता पत्रकारांची नोंदणी , ओळखपत्र वाटप व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सकाळी १०.३० वाजता जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे पदाधिकारी, पत्रकारांचे गुणवंत पाल्य व जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचा सत्कार होणार आहे. दुसऱ्या सत्रात पत्रकारिता भविष्यातील आव्हान आणि ग्रामीण पत्रकार यावर व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे मार्गदर्शन करणार आहे. संघटन व पत्रकार संघटना , व्हॉईस ऑफ मिडियाचे भविष्यातील धोरण या विषयावर प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के मार्गदर्शन करणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या व पत्रकारिता या विषयावर राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले ह्या मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३.३० ते ५ वाजेपर्यंत पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप, १० लाख रुपयाचा अपघात विमा पॉलिसी वाटप व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वितरण होऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकदिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!