“गडचिरोली शहर पोलिसांचे धाडसत्र सुरूच ; काटली येथील दोन दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल, 1 लाख 54 हजारांची देशी दारू जप्त “

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , ऑगस्ट ०३ : तालुक्यातील काटली येथील दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून 1 लाख 54 हजार रुपये किमतीची 22 पेट्या देशी दारू जप्त केल्याची कृती गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने केली. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालाजी बारसागडे, नरेश बारसागडे अशी आरोपींची नावे आहे.

गडचिरोली तालुक्यातील काटली येथे 5 ते 6 दारू विक्रेते आहेत. गावात देशी, विदेशी, मोहाची दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या गावात नगरी, काटली, साखरा, वसा, वसाचेक येथील दारू पिणारे लोक येतात. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दारूचे व्यसनामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अशातच गुप्त माहितीचे आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने दोन दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली असता अंदाजे 1 लाख 54 हजार रुपये किमतीची 22 पेट्या देशी दारू मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करून लालाजी बारसागडे व नरेश बारसागडे या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय मडावी, पोलिस नाईक धनंजय चौधरी, पोलिस नाईक अविनाश लंजे, ऋषाली चव्हाण, तुषार खोब्रागडे यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे उपसंघटक रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन, बुधाबाई पोरटे उपस्थित होते.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!