“आरमोरी-गडचिरोली मार्ग झाला खड्डेमय”
1 min readगडचिरोली नेवस नेटवर्क, ऑगस्ट ०७ ;(प्रतिनिधी) आरमोरी ते गडचिरोली मार्गावर मार्गक्रमण करीत असताना खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा, अशी दुरवस्था झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग ३२ किमीचा असून या वर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने आरमोरी ते गडचिरोली मार्ग खड्डेमय झाला आहे.
गडचिरोली मार्ग वरील खड्डे हा चिंतेचा विषय असून गडचिरोली जिल्हा हा मुख्यालयाचा ठिकाण असून या मार्गाने मंत्री,आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी हे वाहनधारक याच मार्गानेप्रवास करीत असताना हे खड्डे कदाचित त्यांना दिसत नसतील का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आरमोरी-गडचिरोली मार्गा अनेक ठिकाणी खडेमय झाले असून वाहनधारकांचे होणारे अपघात, लोकांचे जाणारे जीव, मोडणारी हाडे हे संबंधित प्रशासनाला दिसत नसेल का? असाही प्रश्न आहे. या मार्गावर तालुक्यातील अनेक विद्यार्थी, प्रसुती महिला जिल्हा मुख्यालयात दाखल होतात कदाचित हेही प्रशासनाला दिसत नसेल. या मार्गाने विद्यार्थी, महिला तसेच इतर वाहनचालक हतबल झाले असून या मार्गावर खड्यापासून अपघात होऊन जीव घेणारा मार्ग बनला आहे.
आरमोरी येथे रक्तसंकलन केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावा
आरमोरी येथे उपजिल्हा रुग्णालयात असून आरमोरी तालुक्यालगत वडसा, कुरखेडा, ब्रम्हपुरी येथील रुग्ण भरती होत असून या ठिकाणी रक्तसंकलन केंद्र नसल्याने जिल्हा मुख्यालयातून आणावे लागते, यासाठी पावसाळ्यात आरमोरी-गडचिरोली मार्गाचा अनेकदा संपर्क तुटतो. त्यामुळे आरमोरी येथे रक्तसंकलन केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.