December 22, 2024

दीड महिन्यापासून आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह सुरू न झाल्याने प्रचंड शैक्षणिक नुकसान ; अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना निवेदन

1 min read

गडचिरोली न्यूज नेटवर्क , ऑगस्ट ०८ : (अहेरी) : दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अहेरी मुख्यालयी राहून शिक्षण पूर्ण करत असतात; मात्र मागील दीड महिन्यापासून आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह सुरू न झाल्याने प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच मुलींना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थिनींनी ६ ऑगस्ट रोजी अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांची भेट घेऊन होत असलेल्या समस्येची जाणीव करून दिली. निवेदनातून समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन तत्काळ सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून समस्येची माहिती घेतली.

पत्र काढण्यात आले. सदर समस्या ही प्रामुख्याने यावर्षी बोर्डाच्या १०वी व १२वीच्या परीक्षेला बसत असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त भेडसावत आहे. कारण, दहावी व बारावीचे महत्त्वाचे वर्ष आहे. शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे.

दीड महिना लोटूनही वसतिगृह सुरू नसल्याने दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा व महाविद्यालयामध्ये हजर कसे राहणार? असा सवाल निवेदनात उपस्थित केला आहे.

प्रकल्प अधिकाऱ्यांना लागलीच लेखी निर्देश

अतिदुर्गम भागातील विद्यार्थी गरीब असल्याने भाड्याची खोली करून राहण्यासाठी त्यांच्या पालकांकडे आर्थिक पाठबळ नसते, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. सदर समस्येची दखल घेत अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी तत्काळ अहेरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी विद्यार्थिनींची ही अडचण विस्तृतपणे समजून घेतली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

About The Author

error: Content is protected !!