December 22, 2024

“कुरखेडा नगरपंचायतीसह राज्यातील १०५ नगरपंचयतींमध्ये प्रशासक बसणार; नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चिती लांबणीवर”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट ०८, (गडचिरोली) : कुरखेडा येथील नगरपंचायतीसह राज्यातील १०५ नगरपंचयतींमध्ये प्रशासक बसणार असून नियोजित असलेली नगराध्यक्ष पदाची निवडणूक अनिश्चित कालावधी करिता पुढे ढकलण्यात आलेली आहे.

कुरखेडा येथील नगरपंचायतीसह राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची मुदत ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये संपुष्टात येत असून राज्यात नगराध्यक्ष निवडीच्या राजकीय हालचाली सुरु असतांना नगर विकास विभागाने काल  संबंधित जिल्हाधिकारी यांचे नावे पत्र काढून  सदर नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदाची सोडत होईपर्यंत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ६० नुसार कार्यवाही करावी असे निर्देशित केले आहे.

शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या सहीने निर्गमित झालेल्या सदर पत्रामुळे राज्यातील राजकीय पुढारी स्तब्ध झाले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हुकूमशाही लादत असल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ६० काय आहे?

(कलम ६०. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अधिकार पदे एकाच वेळी रिकामी होणे)

कोणत्याही कारणामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची अधिकार पदे एकाच वेळी रिकामी झाली तर त्याबाबतीत, मुख्य अधिकाऱ्याने ती बाब जिल्हाधिकाऱ्याला कळविली पाहिजे, आणि नवीन अध्यक्षची निवड होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्याने किंवा जिल्हाधिकारी त्याबाबतीत नेमील अशा अन्य अधिकाऱ्याने अध्यक्षाचे अधिकार वापरले पाहिजेत आणि त्याची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. मात्र त्याला मतदानाचा कोणताही हक्क असणार नाही. जिल्हाधिकाऱ्याने नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, जिल्हाधिकारी, निश्चित करील, इतके पारिश्रमिक नगरपालिकेच्या निधीतून देण्यात येईल.

About The Author

error: Content is protected !!