“चिखलाने त्रस्त झालेल्या हेटीनगर वासियानी चौकात केली धान रोवणी ; प्रशासनाच्या विरोधात गावकरी आक्रमक”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट ०८, (कुरखेडा) : कुरखेडा तालुक्यातील पुराडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या हेटीनगर येथील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करुन ही दुरुस्तीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने आज ८ ऑगस्ट रोजी गावातील लोकांनी चौकातील चिखलात धान रोवणी करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
एकीकडे सततधार पावसा मुळे नागरिक हैराण परेशान आहे, तर दुसरीकडे लोकांना पावसामुळे खूप त्रास सहन करावा लगात आहे. हेटीनगर येथील प्रशासनिक अव्यवस्थेमुळे गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले असून लोकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. वारंवार सूचना करून सुद्धा काहीच उपयोजना ग्रामपंचायत प्रशासनाकडून केल्या जात नसल्याची बघून नागरिकांनी गावातील मुख्य चौकात चक्क रेड्याने नागर-फण घेवून चिखल सपाट करत धानाची रोवणी केली. गावकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची मोठ्याप्रमाणत चर्चा सुरू आहे. नागरिकांनी जरी आज निषेध नोंदविला असला तरी ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागली नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे.