“महसूल पंधरवाडा निमित्ताने तहसील कार्यालय कुरखेडा यांच्यावतीने श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संवाद कार्यक्रम संपन्न”
1 min read*महसूल पंधरवाडा निमित्त तहसील कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन*
कुरखेडा, ऑगस्ट ०८ : महसूल पंधरवाडा निमित्ताने तहसील कार्यालय कुरखेडा यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महसूल पंधरवाडाचा एक भाग म्हणून युवा संवाद कार्यक्रम स्थानिक श्रीराम कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे घेण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी विद्यार्थ्यांना महसूल पंधरवाडा निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या विवीध कार्यक्रमा संदर्भात माहिती देऊन शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य नागेश्वर फाये मुख्य मार्गदर्शक नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, नायब तहसीलदार गुळधे ,अव्वल कारकून अविनाश चून्ने प्रा.प्रदीप पाटणदार उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार गुडधे व अविनाश चुन्ने यांनी नव मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करून निवडणूक विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्राचार्य नागेश्वर फाये यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी युवक व युवती उपस्थित होते.