December 23, 2024

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नागपूर विभागातून सर्वाधिक नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातून ; आतापर्यंत 86 प्रशिक्षणार्थीं नियुक्त”

1 min read

गडचिरोली ०८ जुलै : महसुल पंधरवाडा निमित्त आज ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हाधिकारी संजय दैने व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते 25 प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 86 प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यात आले असून नागपूर विभागात आजपर्यंत सर्वाधिक प्रशिक्षणार्थी गडचिरोली जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले आहे.

या योजनेचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी व जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे उपस्थित होते.
आज नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींची नियुक्ती जिल्हा सामान्य रूग्णालय व त्याअधिनस्त रुग्णालयात करण्यात आली तर ३ प्रशिक्षणार्थींना कृषी विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यासाठी 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका धारकांना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत खाजगी आस्थापनांनीही मनुष्यबळ मागणीसाठी नोंदणी करावी, असे योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!