December 23, 2024

“मोबाइल चोरल्याच्या वादावरून जितेश ची हत्या केल्याचा ३ आरोपींचा काबुलनामा; आरोपींना ४ दिवसाची पोलीस कोठडी”

1 min read

कूरखेडा, ऑगस्ट १०: चिखली येथील जितेश पगडवार या २८ वर्षीय यूवकाचा मृतदेह शूक्रवार रोजी पहाटे चिखली -वडेगाव मार्गावर आढळून आल्याने गावात एकच खळबळ माजली होती. सदर प्रकरणात गावातीलच तिन यूवकाना अटक करण्यात आली आहे. त्यानीच मोबाइल चोरीच्या शूल्लक वादावरून हत्या केल्याची  कबूली दिली आहे.

सविस्तर असे की, आरोपी जितू याचा मोबाइल काही दिवसापूर्वी हरवला होता, व हा मोबाइल मृतक जितेश यानेच पळविला असेल अशी आरोपीना शंका होती. यावरून मागील काही दिवसापासून त्यांच्यात वाद होत होता. हा वाद विकोपाला गेल्याने गूरूवार रोजी वडेगाव रस्त्यावर रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान लोखंडी सळाखीने डोक्यावर वार करीत त्याची हत्या करण्यात आल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.

आरोपी जितू उर्फ विशाल पिसोरे (१९) वैभव सहारे (१९) व अमन पठान (२०) सर्व रा. चिखली याना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी मित्र आहेत हे विशेष.

पोलीसानी प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत काल शूक्रवार रोजी सकाळीच संशयित आरोपीना ताब्यात घेत तपास सूरू केला होता. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी गून्हाची कबूली दिल्याने त्यांचा विरोधात भारतिय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१),३(५) अन्वये गून्हा दाखल करीत अटक करण्यात आली. घटनेचा तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. अटक केलेल्या आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने तिन्ही आरोपींना ४ दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. मृतक अविवाहित व रोजंदारी मजूरी करीत होता. त्याचा मागे वृध्द आई-वडील तसेच ग्रामपंचायत संगणक चालक असलेला मोठा भाऊ व वहीणी आहे.

About The Author

error: Content is protected !!