December 22, 2024

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे पालक – शिक्षक संघाची स्थापना

1 min read

कुरखेडा , ऑगस्ट १२ : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे पालक – शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश गौरकार तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक किशोर कोल्हे , जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे , सचिव मनोज सराटे , छायाताई खंडाइत यांची सहसचिव व शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महा. कुरखेडा येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले .
यावेळी पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर अविनाश गौरकार , उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे तर सचिव म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक मनोज सराटे हे होते व सहसचिव म्हणून छायाताई खंडाइत यांची निवड करण्यात आली तसेच शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील कुरखेडातील पालक – शिक्षक संघाचे सदस्य म्हणून प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याच्या पालकाची निवड करण्यात आली .
सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव वाघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत नरुले यांनी मानले . यावेळी बहुसंख्य पालक , विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!