December 23, 2024

“अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जख्मी; झाडावर चढून वाचवला जीव”

1 min read

कुरखेडा, ऑगस्ट १२:  पुराडा वन क्षेत्रात येत असलेल्या मौजा डोंगरगाव येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर अस्वलीने हल्ला चढवत गंभीर जख्मी केल्याची घटना आज दुपारी १२.३० दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार पुराडा वन परिक्षेत्रात असलेल्या कक्ष क्रमांक १०६०, २४० लागत स्वतःच्या शेतात काम करत असलेले शेतकरी मनोज श्रीराम किरंगे, ३५ वर्ष रा. पो. डोंगरगाव यांच्यावर अचानक अस्वलीने हल्ला चढविला. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सदर शेतकऱ्याने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाय अस्वलीच्या तावडीत सापडला. अस्वलीने पायाला जबर चावा घेतल्याने मोठ्याप्रमाणत रक्तस्राव सुरू झालं. कसाबसा झाडावर चढत आपला जीव वाचविण्यात शेतकऱ्याला यश आले.

काही क्षणानंतर अस्वल तिथून निघून गेल्याने वन विभागला घटनेची माहिती देण्यात आली. पुराडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी डिगोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळ गाठून तातडीने उपचारार्थ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.  शेतकरी गंभीर जख्मी असल्याने कुरखेडा येथे प्राथमिक उपचार देवून पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले .

घटनेचा पंचनामा करुन तात्काळ शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती बालाजी डिगोळे, वन परिक्षेत्र अधिकारी पुराडा यांनी दिली आहे. शेतकऱ्याला तातडीने उपचार मिळवा यासाठी वन विभागाचे पुराडा क्षेत्र सहायक  कामचंद ढवळे, शंकर कोंडावार वनमजूर, जोगेंद्र धुपजारे,रवींद्र गहाने वाहनचालक यांनी अथक प्रयास केले.

About The Author

error: Content is protected !!