April 25, 2025

“रेल्वेच्या धडकेत ४ वर्षीय वाघिणीचा मृत्यु; एकलपूर कक्ष क्रमांक ९७ मधील घटना”

गडचिरोली , ऑगस्ट १२ : वडसा वनविभागांतर्गत वडसा परिक्षेत्रातील उपक्षेत्र वडसा नियतक्षेत्र एकलपूर कक्ष क्रमांक ९७ (राखीव वन) मध्ये गांधीनगर गावानजीक बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर माल वाहतुक रेल्वेच्या धडकेत ४ वर्षीय वाघाचा (मादी) मृत्यु झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजताचे दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, पशु वैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) TTC ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, दिपक पी. मेडीकुंटावार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. मोकास्थळाची पाहणी केली असता सदर वाघ मृत अवस्थेत आढळून आला. मृत वाघाचा मोकास्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघाला वडसा परिक्षेत्रातील वडसा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. त्यानंतर पशु वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या चमुने मृत वाघाचे शव विच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण केली. मृत वाघाचे सर्व अवयव असल्याचे आढळून आले. पंच यांचे उपस्थितीत तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणाचे नियमानुसार मृत वाघाला जाळून नष्ट करण्यात आले. संपुर्ण शरीर नष्ट होईपर्यंत सर्व अधिकारी व पंच मोक्यावर उपस्थित होते.

सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचे मार्गदर्शनाखाली कुरखेडाचे उपविभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एम.जी. मेश्राम, पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, (वन्यजीव) टीटीसी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकिय अधिकारी दिपक पी. मेडीकुंटावार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी अनिल दशहरे, यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, तिजारे क्षेत्र सहाय्यक अजय मराठे, वनरक्षक गजभिये, वनरक्षक भोजराम भुरकुंडे, वाहन चालक मनन शेख यांचे सहकार्याने पार पडली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!