December 23, 2024

“थेट कंपनी सोबत लोहखनीज वाहतूक करार करण्याची वाहतूकदार संघटनेची मागणी; अन्यथा १६ ऑगस्ट पासून जिल्ह्यातील लोह खनिज वाहतूक बंद पाडण्याचा इशारा”

1 min read

गडचिरोली,ऑगस्ट १३,(प्रतिनिधी) : थेट कंपनी सोबत लोहखनीज वाहतूक करार करण्याची वाहतूकदार संघटनेने मागणी केली असून शासन ठरविलेल्या दरानुसार कार्यारंभ आदेश न दिल्यास लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बंद आंदोलन करून बंद करू असा इशारा गडचिरोली ट्रांसपोर्ट वेल्फेयर असोसिएशन द्वारे पत्रकार परिषद घेवून देण्यात आला आहे.

जिल्हातील  स्थानिक वाहतुक धारकांना न डावलता प्रथम प्राधान्य देत सर्व डेस्टिनेशनचे कार्यारंभ आदेश इतर कोणत्याही दलाल-मध्यस्थी मार्फत न देता थेट लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी आणि त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि. कंपनीतर्फे शासन ठरविलेल्या दरानुसार कार्यारंभ आदेश देवून वाहतूक करार करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास जिल्ह्यातील संपूर्ण लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बंद पाडून लोकशाहीच्या मागनि आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरजागड लोह खनिज सुरू होण्यापूर्वी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य क्रमाने अनेक रोजगार मिळणार असल्याचे शासन प्रशासन व कंपनीकडून अनेकवेळा सांगितले गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारक यांनी स्वतःचे घर, जमीन गहाण ठेवुन लोह खनिज वाहतुकीसाठी जड वाहने खरेदी करून सुरजगड  येथील वाहतुकीच्या कामावर लावले.

या दरम्यान काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांकडुन ७०-८० बाहने जाळण्यात आले, त्यात स्थानिक वाहतुकदारांचे देखील वाहने यात नक्षलवादी कडून जाळले गेले. सदर नुकसानीचे देखील कंपनीकडुन कोणत्याही प्रकारचे मदत न मिळाल्याने सुध्दा स्थानिक वाहतुकदार लोह खनिजाचे वाहतुक करण्यास परत वाहने कामावर पाठविले.

परंतु लोह खनिजाचे वाहतूक पुर्णपणे सुरळीत सुरू झाल्याचे चित्र दिसताच लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी/त्रिवेणीअर्थमुवर्स प्रा.लि. कंपनी यांनी मिळुन स्थानिकांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे अटी शर्ती लावुन लोह खनिजाचे वाहतुक करण्यापासुन वंचित करत आहे. तसेच कंपनी मार्फत सर्व डेस्टिनेशनचे कार्यारंभ आदेश न देता एका अन्य जिल्ह्यातील दलाल/मध्यस्तीकडुन कमिशनचे रक्कम घेऊन वाहतुक करण्यास भाग पाडीत आहे. तसेच लोह खनिजाचे वाहतुकीसाठी जिल्हा वाहतुकदारांना डावलुन इतर जिल्हा व राज्यातील वाहतुक धारकांना प्राधान्य क्रमाने वाहतुकीचे काम देत आहे. या सर्व प्रकरणामुळे स्थानिक वाहतुकदार यांना नुकसान होत आहे.

सदर या प्रकरणाचे शासन स्तरावरून चौकशी करून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी/ त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.नि. कंपनीला स्थानिक जिल्हा वाहतुक धारकांना सर्व डेस्टिनेशनचे इतर कोणत्याही दलाल/मध्यस्तीमार्फत कार्यारंभ आदेश न देता, सरळ लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी/त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि. कंपनीतर्फे आदेश देण्यात यावे. लोह खनिज वाहतुकीसाठी देण्यात येत असलेल्या दर देखील शासनाने ठरविल्यानुसार दर देण्यात यावे. लोह खनिजाचे वाहतुकीसाठी जिल्ह्यातील वाहतुकदारांना न डावलता प्राधान्य क्रमाने सोडिंग व वाहतुकीचे काम देण्यात यावे. तसेच स्थानिक जिल्ह्यातील कोणतेही व्यक्ती लोह खनिज वाहतुकीसाठी वाहन खरेदी केल्यास तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशी मागणी  पत्रकार परिषदेत घेवून देण्यात आली आहे.

या निवेदनाचे तात्काळ निराकरण न केल्यास जिल्ह्यातील सर्व स्थानिक वाहतुकदार एकत्र येऊन  १६ आगस्त पासुन जिल्ह्यातील लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बेमुदत बंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

सदर पत्रकार परिषद निखील निमाई मंडल,आशिष अशोक मेडीवार, गणेश शंकर दासरवार, मल्लरेड्डी येमनुरवार,जमीर शेख,संदीप दिलीप गुडपवार,किशोर रापेल्लीवार  यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली यावेळी मोठ्यासंखेने जिल्ह्यातील वाहतुकदार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!