December 23, 2024

“रानटी हत्तींचा कळप पोहोचला मर्मा गावाजवळ; नियंत्रण टीम वन कर्मचा-यांनी गावकऱ्यांच्या मदतीने हत्ती कळपाला जंगलाच्या दिशेने वळविले”

1 min read

धानोरा, ऑगस्ट १५:  रानटी हत्तींचा कळप तालुक्यातील मर्मा गावाजवळ पोहोचताच संभाव्य धोका टाळण्यासाठी हत्ती नियंत्रण टीम व वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने हत्ती कळप जंगलाच्या दिशेने वळविले.

प्राप्त माहितीनुसार १४ ऑगस्ट ला रात्रो जवळपास ९ वाजताच्या सुमारास हत्तींचा कळप गडचीरोली वन विभाग वन परीक्षेत्र मुरुंगाव नियत क्षेत्र मर्मा गावाजवळील बोडीत (गाव तलाव) आल्याची माहिती वन विभागाला गावकऱ्यांकडून मिळाली. गावातील घरांना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी मालेवाडा व हत्ती सह नियंत्रण टीम  कर्मचारी मालेवाडा यांना सोबत घेउन मर्मा गावी पोहोचले. दरम्यान  मुरुमगाव रेंज मधिल कर्मचारी सुधा मदतीसाठी आले होते. रानटी हत्ती गावा लगत आले असल्याची खात्री करून गावकरी व वन कर्मचाऱ्यांसोबत समन्वय करून हत्ती कळप जंगलाच्या दिशेने वळते करण्याची योजना आखली.

नियोजित पद्धतीने गावातील संभाव्य नुकसान टाळत मोठ्या शिताफीने हत्ती कळप जंगलाच्या दिशेने वळविण्यात यश आले. गावकऱ्यांच्या सतर्कतेने व वन कर्मचाऱ्यांच्या तूर्त प्रतिसादाने मर्मा गावातील होणारे संभाव्य नुकसान व जीवित हानी टाळता आल्याने वन कर्मचाऱ्याचे सर्वस्तरावरून कौतुक केले जात आहे.  सध्या हत्ती कळप गडचीरोली वन विभाग वन परीक्षेत्र मुरुंगाव नियत क्षेत्र मर्मा कक्ष क्र. 724 मधिल  जंगलात आहेत .

About The Author

error: Content is protected !!