December 22, 2024

“महिन्याभरापूर्वी भर्रीटोला- नवरगाव मार्गावर बांधण्यात आलेला पुल – वजा – बंधारा पावसाने वाहुन गेला”

1 min read

कोरची, ऑगस्ट १४ : कोरची तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरीकांना आवागमनासह सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने भर्रीटोला- नवरगांव मार्गावर पुलवजा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र आलेल्या मुसळधार पावसाने हा पुलवजा बंधारा वाहुन गेल्याने उपविभागीय जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कोरची तालुक्याच्या नवरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत भिमपुर, साल्हे, भर्रीटोला व नवरगाव असेएकुण चार गावे येतात. भर्रीटोला ते नवरगाव या मार्गावर जिल्हा संधारण अधिकारी जि.प. गडचिरोली, जलसंधारण उपविभागीय अधिकारी जि.प. (लपा) उपविभाग कुरखेडा अंतर्गत २० लाख ७० हजार २२३ रुपये किंमतीचे पुल वजा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम काही महिण्यापुर्वीच करण्यात आले.

सदर पुल वजा बंधाऱ्याचे बांधकाम गोंदिया जिल्ह्यातील मे. सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. दरम्यान पुलवजा बंधारा वाहुन गेल्याने आता आवागमनाचा तसेच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. नवरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावातील नागरीकांच्या आवागमनाचा प्रश्न सुटावा याकरीता काही महिण्यांपुर्वी भर्रीटोला- नवरगांव मार्गावर पुल वजा बंधारा बांधण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात वाहून गेल्याने बांधकाम नियमानुसार करण्यात आला नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे परिसरातील नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीनवरगावच्या सरपंचा कौसल्या काटेंगे यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!