युवकांचे भवितव्य उज्वल करायचे असले तर गावातील दरुबंदी यशस्वी करण्यासाठी हातभार लावा – अनिल मच्छिरके , माजी उपसरपंच
1 min readकुरखेडा, ऑगस्ट १६ : १५ ऑगस्ट च्या विशेष ग्रामसभेत चिखली गावातील अवैध दरुबंदीचा विषय ग्रामस्थांनी एक पुढाकार घेत एक मतानी पारीत केला. सदर दारू बंदी कायम ठेवण्यासाठी व गावातील युवकांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी दारू बंदी यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा अशी प्रतिक्रिया चिखली येथील माजी उपसरपंच अनिल मच्छिरके यांनी दिली आहे.
आपण उपसरपंच असतांना गावातील अवैध दारू बंदी करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु त्यावेळी लोकांची एकी नसल्याने काही दिवस बंद असलेली अवैध दारू विक्री पुन्हा सुरू होवून स्थिती जैसेथे व्हायची. दारू मुळे गावातील युवक वर्ग मोठ्याप्रमाणत व्यसनाधीन होवून स्वतःचे आयुष्य बर्बाद करीत आहे. दारू मुळे गावात तंटे भांडण मोठ्या प्रमाणात होवून जीवे मरण्यापर्यंतचे गुन्हे घडायला सुरुवात झाली आहे. दारू सोबतच गांजा, जुगार , पत्ते, सारखे अवैध कामांना प्रोत्साहन मिळतो. गावातील सामाजिक समतोल बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. युवा अवस्थेत दारूच्या आहारी जावून गावातील अनेक घरातील युवकांचा अकाली निधन होवून त्यांच्या घरचा आधार हिरवलेला आहे. ही सर्व विपरीत परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असेल व गावातील सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर गावातील लोकांनी पुढाकार घेत पुरुषोत्तम भाऊ तिरगम यांच्या अध्यक्षतेखाली व लोकेश पोटावी यांच्या पुढाकाराने गठित केलेल्या ग्रामस्तरीय दरुबंदी समितीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून गावातील दारू सहित सर्व अवैध व्यापार प्रभाविपणे हद्दपार करता येईल.