उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे शासनाचे आवाहन
1 min readगडचिरोली, ऑगस्ट १६ : राज्यात ७ सप्टेंबर २०२४ पासून चालू होणार्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासन निर्णयातील परिशिष्ट ‘अ’मधील विहित नमुन्यात हे अर्ज करणे अपेक्षित आहे.
पुरस्कार देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देईल.
३ गणेशोत्सव मंडळांची शिफारस करून जिल्हाधिकार्यांद्वारे प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर केली जाईल.