कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या ; डॉ. सोनल कोवे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात कॅंडल मार्च
1 min read
- गडचिरोलीत कॅंडल मार्च काढून वाहण्यात आली श्रध्दांजली
गडचिरोली , ऑगस्ट १७ : कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनल कोवे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन, गडचिरोली असोसीएशन ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर, इंडियन मेडिकल असोसिएशन, मॅग्मो संघटना, गडचिरोली नर्सेस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असताना एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या क्रुरकर्मी, निर्दयी गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व पीडित महिला डॉ. सुवर्मा गोस्वामी यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली वाहण्यात आली. शहरातील नामवंत डॉक्टर, परिचारिका, तसेच शहरातील महिला व पुरुषांनी सहभागी झाले. दंत व मुखरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ सोनलताई कोवे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी शालीनी कुमरे, डॉ. प्रविण किलनाके, डॉ. सुनील मडावी, डॉ. लालाजी वट्टी, डॉ. प्रशांत चलाख, डॉ. किशोर वैद्य, डॉ. प्रांजली आईंचवार, डॉ. वैशाली चलाख, डॉ. दीप्ती वैध, डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. रुपाली पाटील, डॉ. हेमराज मसराम, डॉ. उमेश समर्थ, डॉ. अतुल गाठीबांधे, डॉ. खूशबू दुर्गे, डॉ. चेतन कोवे, डॉ. निकिता कुलसंगे, डॉ. अंकिता धाकडे, डॉ. मोनाली मेश्राम, प्रा. संध्या येलेकर, पुष्पलता कुमरे, लता मुरकुटे, मंगला कोवे, पुष्पा कुमरे, आशा मेश्राम, वंदना मेश्राम, मनीषा मडावी, लता कुमरे, प्रियंका वासनिक, अपर्णा सहारे, सुनीता बनसोड, शिला मेश्राम, मीनाक्षी वासने, तनुजा आत्राम, मालती कुमरे, निमती तीरगे, हरबा मोरे, वसंत राऊत, गुलाब मडावी, संजय चन्ने, संजय मेश्राम, जावेद खान, स्वप्नील बहिरे, धवल सूचक, विजय राऊत आदी उपस्थित होते.