जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करुन उद्योजकांनी उद्योग उभारावेत – योगेश कुंभलवार
गडचिरोली,(जिमाका)दि.20: गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी युवक- युवतींनी उपलब्ध नैसर्गिक साधन संपदेवर आधारित उद्योग उभारुन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग सहसंचालक, मैत्री मुंबई, योगेश कुंभलवार यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली मार्फत दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी व्यवसाय सुलभीकरण एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आर.सेटी. हॉल, प्रशिक्षण केंद्र कॉम्पलेक्स, गडचिरोली, बँक ऑफ इंडिया येथे करण्यात आले. या कार्यशाळेस उद्योग व व्यवसाय सुलभीकरण कक्षाचे सल्लागार अनिर्बन दत्ता, मैत्री श्रीमती रिना मिरांडा, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोलीचे महाव्यवस्थापक अतुल पवार, गडचिरोलीमधील उद्योजक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये अनिर्बन दत्ता व श्रीमती रिना मिरांडा यांनी मैत्री कक्षाच्या व्यवसाय सुलभीकरण पोर्टल विषयी माहिती दिली. तसेच माहिती तंत्रज्ञान पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणाविषयी व शासनाच्या नवीन धोरणांविषयी माहिती देणेत आली. तसेच उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करणेत आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री. घुमारे, खेडेकर, टेकाम, गोतमारे, गेडाम यांनी केले होते. असे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.