“मुनघाटे महाविद्यालयाच्या ‘कॉलेज कॅम्पस इंटरव्यू’ मध्ये ३ विद्यार्थ्यांची पर्यावरण भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून निवड”
1 min read“टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अंतर्गत झारखंड येथील लोहखनिज खान येथे पर्यावरण भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती मिळणार”
कुरखेडा, ऑगस्ट १७ : येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या “कॉलेज कॅम्पस इंटरव्यू” उपक्रम अंतर्गत आयोजित मुलाखात मधे विद्यालयाचे ३ विद्यार्थी भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्र व ॲनाकॉन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०१४ ला महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आलेले होते . सदर कॅम्पस मुलाखती ॲनाकॉन ग्रुपचे श्रीकांत व्यवहारे ,अंजू नायक आणि डॉ. प्रियंका मजुमदार यांनी घेतल्या. महाविद्यालयातील व परिसरात आयोजित सदर आयोजनात शेकडो विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.
महाविद्यालयातील तुषार सहारे ,निखिल लेदे ,अभिषेक पिलारे या विद्यार्थ्यांची टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अंतर्गत झारखंड येथील लोहखनिज खान येथे पर्यावरण भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांचा गौरव करण्यात आले.
यापूर्वीही महाविद्यालयात अशा प्रकारच्या विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करून महाविद्यालयातील व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना विविध कंपन्या मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सदर विद्यार्थ्यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक तथा भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ . गुणवंत वडपल्लीवार, डॉ. गणेश सातपुते यांना दिलेली आहे .
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ . राजाभाऊ मुनघाटे, दंडकारण्य संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेले आहे.