December 22, 2024

“व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेश कार्यकारी निवड; अध्यक्षपदी रोहित जाधव, प्रदेश कार्याध्यक्षपदी अब्दुल कयूम तर, उपाध्यक्षपदी विकासकुमार बागडी , सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड”

1 min read

मुंबई, ऑगस्ट १७  : (प्रतिनिधी) : व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यामध्ये प्रदेश अध्यक्ष पदी रोहित जाधव यांची निवड झाली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये चौघांनी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या राज्यभरातील पदाधिकारी यांनी पत्रकार मतदान केले. यातून सांगलीच्या रोहित जाधव यांना सर्वाधिक मते मिळाल्यामुळे त्यांची प्रदेश अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच कार्याध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस या पदासाठी ही निवड जाहीर करण्यात आली. झालेल्या मतदानाचा निकाल पाच ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून रोहित जाधव सांगली, प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून अब्दुल कय्युम छत्रपती संभाजी नगर, प्रदेश सरचिटणीस म्हणून वामन पाठक लातूर, तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून विकासकुमार बागडी जालना यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. संजीवकुमार कलकोरी व राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी काम पाहिले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगची निवडणूक ही संघटनेच्या इतर विंगसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेनुसार मार्गदर्शक ठरणारी झाली. या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश मार्गदर्शक साप्ताहिक विंगचे विनोद बोरे यांनी पुढाकार घेतला होता. या विजयी पदाधिकार्‍यांचे राज्यभरातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या, पदाधिकारी सदस्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

आता पदाधिकारी अधिक सक्षम पणे कार्य करतील – संदीप काळे
व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये नव्याने निवडून आलेले सर्व पदाधिकारी कार्यक्षम आहेत. त्यांच्याकडून आगामी काळात अधिक सक्षमपणे काम होईल असा विश्‍वास संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केला आहे.

उर्वरित राज्य कार्यकारणी लवकरच – रोहित जाधव
निवडणुकीच्या माध्यमातून चौघांची राज्य कार्यकारणीवर निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणीची लवकरच निवड जाहीर करण्यात येईल असे नूतन प्रदेशाध्यक्ष रोहित जाधव यांनी सांगितले.

राज्यातील सर्वांना सोबत घेणार – अब्दुल कय्युम
येणार्‍या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन अत्यंत चांगले काम करून दाखवणार आहे. साप्ताहिकांच्या विविध समस्या सोडवणार आहे, प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्युम यांनी सांगितले.

सर्व विभागांना न्याय देऊ – वामन पाठक
व्हॉईस ऑफ मीडियाच्या उर्वरित कार्यकारणी मध्ये राज्यातील सर्व विभागांना समान न्याय देण्याच्या प्रयत्न करू असे प्रदेश सरचिटणीस वामन पाठक यांनी सांगितले आहे.

About The Author

error: Content is protected !!