“शेवटच्या श्वासापर्यंत लोककल्याणासाठी झटत राहणार – मंत्री धर्मराव बाबा अत्राम”
1 min readआलापल्ली/गडचिरोली, ऑगस्ट १८ : वचन देतो या मंडपात बसलेल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत लोकल्याणाकरिता झटत राहणार अशी ग्वाही आलापल्ली येथे आयोजित रोजगार मेळाव्या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी दिली.
मी माझ्या मागील निवडणुकीच्या घोषणा पत्रात शिक्षा , सिंचन आणि रोजगार बाबत लोकांना वचन दिले होते. त्या वचनांनपैकी रोजगार बाबत पूर्तता आज रोजगार मेळाव्याच्या स्वरूपात होत आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रात आरोग्य सेवा प्रबळ व्हाव्या शिक्षणाचे प्राथमिक ते उच्च शिक्षण या भागातील लोकांना मिळावे या करिता वाचन पूर्ती केलेली आहे.
काही पुढाऱ्यांनी विरोध केल्याने या क्षेत्राचा विकास १५ वर्ष पुढे ढकलल्या गेला. यांनी विरोध केला नसता तर आम्ही १५ वर्ष समोर राहिलो असतो. रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर या ठिकाणी उपलब्ध संसाधनाच्या आधारावर उद्योग निर्माण करावे लागतील ही गोष्ट विरोधक जाणत असले तरी फक्त राजकीय पोळ्या शेकण्यासाठीच विरोध करतात. सर्व विरोध झुंगारुन मी या क्षेत्रात विकास करण्यासाठी उद्योग निर्मितीसाठी पुढाकार घेतला. आज ६० वेगवेगळ्या कंपन्या मुलाखती घेवून रोजगार देण्यासाठी येथे आलेल्या आहेत भविष्यात या भागात निर्माण होणाऱ्या उद्योगातून २० हजार स्थानिक युवकांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण होईल. माझी स्वतःची मालकी असलेली वडलापेठ येथिल जमीन सुरजगड इस्पात कंपनीला लोह प्रकल्प उभारणी करिता दिलेली आहे. विरोधक म्हणतात ही जागा धर्मरावची नाही. त्यांना सांगा खोटे बोलू नका. माझे आजोबा पणजोबा या क्षेत्राचे राजे होते. हा पूर्ण परिसर राज्याच्या मालकीचे होते. माझ्या पूर्वजांकडून माझ्या वाट्यात आलेल्या जमिनी पैकी दीडशे एकर जागा येथील युवकांना रोजगार मिळवा म्हणून फुकटात देवून टाकली. या वर शंका निर्माण करणारे आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांचा मी स्वागतच करतो. जेवढ्या टीका टिप्पणी होतील तेढाच पाठबळ मला विकास काम करण्यासाठी मिळतो त्या मुळे त्यांच्या टिकांचे मी वाईट मानून घेत नाही. उलट त्यापासून माल जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.
गडचिरीली जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कौशल योजने अंतर्गत १२५०० युवक – युवतींना त्यांच्या गावातच शासकीय कार्यालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात नोकरी देण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे. आम्ही तुम्हाला रोजगार देण्यासाठी कटिबद्ध आहोत तुम्हीही रोजगार देणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आव्हान यावेळी मंत्री अत्राम यांनी केले.
याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रशस्तीपत्र व साहित्य देवून गौरव करण्यात आला.
“जिल्हयाचा विकास निरंतर ठेवायचा असेल तर मंत्री धर्मराव बाबा शिवाय दुसरा पर्याय नाही” – रवींद्र वासेकर, जिल्हा अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस
प्रखर विरोध असतांना सुद्धा सुरजगड सारख्या अतिसंवेदनशील लोहखदाणीच्या उत्खननाची सुरुवात करण्यात कुणाचं वाटा असेल तर तो फक्त आणि फक्त मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचाच आहे. या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त बाबा मधेच आहे. जिल्हयाचा विकास निरंतर ठेवायचं असेल तर बाबाच्या पाठीशी खंबीर व निस्वार्थपणे उभे राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले.